‘कदाचित अजूनही’ : स्त्रीला माणूसपणाच्या अधिक जवळ घेऊन जाणारी कविता
रूढार्थानं ही कविता स्त्रीवादी नाही. ती स्त्रियांचा यातनामय संघर्ष, स्त्रियांच्या जगण्यातील सूक्ष्म व जटील अनुभव, त्यांची दुःखे सिद्धान्ताच्या कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय मांडते. विद्रोहाचा रस्ता ही कविता चालत नाही. असंवेदनशील भवतालात ती त्यांना खुणावणाऱ्या क्षितीजांचा वेध घेते, दुःख आणि यातना या बरोबरच मातृत्वाच्या नात्यातून स्त्रीला लाभणाऱ्या जिव्हार नात्याच्या सुखासारखे उत्कट आनंदाचे क्षण मांडते.......